पुणे : मुसळधार पावसामुळे वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला.


पुण्यात शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळी झाला मुसळधार पाऊस .


PRESS MEDIA LIVE : पुणे : प्रतिनिधी :

पुणे - शहरात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. गेल्या 12 तासांत शहरात 32.5 मिलिमीटर पावसाची उच्चांकी नोंद झाली. तर, या पावसाने सुमारे 73 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ झाली. तर, शनिवारी देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कर्नाटक ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मागील 24 तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पाऊस झाला. शहरात शुक्रवारी सकाळी पावसाला त्यानंतर दुपारी विश्रांती घेत, सायंकाळी पुन्हा पाऊस झाला. मध्यवर्ती भागासह केळकर रस्ता, वारजे उड्डाणपूल, नळस्टॉप, डेक्‍कन, टिळक चौक, स्वारगेट, सिंहगड रस्ता, कोथरूड, टिळक रस्ता आदी मुख्य रस्त्यांवर पाणी साचले होते. कार्यालयीन वेळेदरम्यान पाऊस झाल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ झाली. याशिवाय, सिग्नल बंद होते. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

1948 नंतर प्रथमच जानेवारीत इतका पाऊस
पुण्यात 23 जानेवारी 1948 रोजी 24 तासांत 22.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर, 1969 ते 2020 दरम्यानच्या नोंदीनुसार, जानेवारी 1995 मध्ये 14.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर सुमारे 73 वर्षांनंतर पहिल्यांदाच जानेवारीत उच्चांकी पाऊस पडला आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post