पुणे : जमियत उलमाये पुणे शहर तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.
PRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला :
पुणे : येथील जमीयत ऊलमाये पुणे शहर तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन कोंढवा कौसर येथील बाबर हॉल येथे करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात युवकानं पासून ते वृद्धव्यक्तींनी सुद्धा रक्त दान केले. याच बरोबर मोफत डोळे तपासणी सुद्धा करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना भेट वस्तू देण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरवात सकाळी 10.30 पासून झाली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्यमंत्री अब्दुल सत्तार होते ते प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.अमोल कोल्हे, ( खासदार शिरूर ) ऑल इंडिया हज कमिटी सदस्य अल्हाज इब्राहिम भाईजान, हडपसर आमदार चेतन तुपे, माजी आमदार महादेव बाबर , प्रसाद बाबर होते. या वेळी सर्व पत्रकारांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जमियत उलमाचे कारी इद्रिस यांनी केले.