पुणे : - कात्रज परिसराने नेहमीच खासदार, आमदार व नगरसेवक यांना निवडून देण्याचे महत्त्वपूर्ण काम प्रत्येकवेळी केले आहे. कात्रज हे पुणे शहराच्या दक्षिण भागातील महत्त्वाचा भाग आहे. या भागाचा संपूर्ण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कायम कटिबद्ध आहे. येणाऱ्या काळामध्ये महापौर हा कात्रजचाच असणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष व आमदार चेतन तुपे यांनी व्यक्त केला.
नगरसेविका अमृता बाबर यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक 40 ब भागामध्ये मूलभूत सुविधांसाठी सुमारे दोन कोटी व आमदार फंडातून एक कोटी असे एकूण तीन कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन कात्रज परिसरातील गावठाण, कात्रज तलाव, सुंधामातानगर, यावेळी आमदार तुपे बोलत होत
आप्पासाहेब भोसले : हातकणंगले तालुका प्रतिनिधी
अंजलीनगर खाण भागातील जागामालकांना टीडीआर देऊन, त्या ठिकाणी मनपाचे उद्यान विकसित करण्यात यावे,कात्रज परिसरामध्ये पेशवेकालीन तलाव आहे. पेशवाईत कात्रज मार्फत शहराला मुबलक पाणी होते. मात्र, आताच्या परिस्थितीमध्ये पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्या कात्रज परिसरामध्ये आहेत. मात्र, कात्रजमधील नळांना नेहमीच अर्धे पाणी मिळत, असे नमेश बाबर यांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिले.नगरसेविका अमृता बाबर म्हणाल्या की, स्थानिक कात्रजकरांना मुबलक पाणी मिळावे. तसेच, प्रभागातील विविध विकास कामांसाठी सदैव पुढाकार घेऊन कात्रज परिसरासाठी निधी आणला आहे. यावेळी सागर बाबर, गुरुद्वाराचे बाबाजी, नाना पवार, रमेश जाधव, बाप्पू अलगुडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.