नामांतर लढ्यातील योद्ध्यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते झालेल्या सत्कार सोहळ्यात पँथर चळवळीच्या आठवणींना उजाळा
मुंबई दि. 20 - आम्ही आहोत आंबेडकरवादी ; लागू नका आमच्या नादी; आम्ही आहोत नामांतरवादी ; सर करायची आहे आम्हाला मुंबई ची गादी असा काव्यमय ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी घाटकोपर पूर्वच्या माता रमाबाई आंबेडकर नगरातील शहिद स्मारक सभागृहात दिला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या 27 व्या वर्धापन दिन सोहळ्यात नामांतर आंदोलनातील योद्ध्यांचा सत्कार नामांतराचे शिल्पकार म्हणून ना रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. विचारमंचावर सौ.सीमाताई आठवले; काकासाहेब खंबाळकर; गौतम सोनवणे ; सभा अध्यक्ष डी एम चव्हाण मामा; चिंतामण गांगुर्डे; नंदू साठे; काका गांगुर्डे; जयंती गडा; संजय वानखडे; चंद्रकांत कसबे; चंद्रशेखर कांबळे; मुश्ताक बाबा;डॉ हरीश अहिरे; ऍड.आशा लांडगे; ऍड.अभया सोनवणे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा लढा हा ऐतिहासिक लढा ठरला. आमच्या अस्मितेचा लढा प्रेरणा देणारा लढा ठरला. भारतीय दलित पँथर ने नामांतर लढ्यात मोठे योगदान दिले. शाहिद पोचिराम कांबळे; जनार्दन मवाडे यांची नावे या नामांतर वर्धापन दिन कार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराला देण्यात आली होती तसेच विचार मांचाला शाहिद गौतम वाघमारे यांचे नाव देण्यात आल्याबद्दल संयोजकांचे कौतुक करून नामांतर लढ्यातील ज्ञात आणि अज्ञात शाहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. नामांतर लढ्यात भीमसैनिकांच्या एका पिढीने आपल्या तरुण्याची होळी केली.जीवाची बाजी लाऊन नामांतर लढा लढल्याच्या आठवणी ना रामदास आठवलेंसह अनेक वक्त्यांनी सांगितल्या.नामांतर लढ्यात स्वार्थाचा
त्याग करणारे कार्यकर्ते आंदोलनात उभे राहिले याची आठवण ना रामदास आठवले यांनी सांगितली.
26 जानेवारी 1994 पूर्वी मराठवाडा विद्यापीठ नामांतर करावे अन्यथा मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन असा ईशारा दिल्यानंतर 14 जानेवारी 1994 रोजी नामांतर झाले. लॉक डाऊन नंतर बऱ्याच काळाने आंबेडकरी चळवळीतील जुने जाणते कार्यकर्ते नामांतर वर्धापनदिना निमित्त एकत्र आणल्याबद्दल संयोजकांचे ना रामदास आठवले यांनी कौतुक केले. नामांतर लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिल्या बद्दल नामांतर आंदोलनातील योद्धे म्हणून रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; काकासाहेब खंबाळकर; गौतम सोनवणे यांच्यासह दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ; दिवंगत प्रा अरुण कांबळे ; या दिवंगत महनीय नेत्यांनाही मरणोत्तर नामांतर योद्धे म्हणून सन्मानित करण्यात आले. भारतीय दलित पँथर पासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत अनेक नेत्यांचा यावेळी नामांतर लढ्यात सहभाग घेतल्या बद्दल नामांतर योद्धे म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी मोठया संख्येने रिपाइं चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.