शिक्षण नव्हे दुकानच .....
PRESS MEDIA LIVE :
कोरोनाव्हायरस या संसर्गाने थैमान घातले असून देशात कडक संचारबंदी असल्याने व्यापार-उद्योग दळणवळण बंद होते लोक घरामध्ये थांबून आहेत त्यामुळे #आर्थिक उत्पन्नाचे #स्त्रोत बंद झाले तर अनेकांचे नुकसान झाले आहे अशा बिकट परिस्थितीत सन 2020-21 च्या #शैक्षणिक_संस्थांना #राज्य_शासनाकडून शालेय फी विषयी अनेक #सूचनांचे आदेश देण्यात आलेले असून तरी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इंग्लिश माध्यम #सीबीएससी पॅटर्न पद्धतीच #सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल,#शिरोली,या शाळेमधून विद्यार्थ्यांना व पालकांना फी वसुलीसाठी अनेक प्रकारें दबाव आणला जात असून या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वेळोवेळी पालकांना हातभार लागावा म्हणून अनेक नियमावली बनवून आदेश दिलेले असून सुद्धा ते आदेश धाब्यावर बसवून पालकांच्या कडे वारेमाप फी वसूल करत असून यामध्ये #सुरक्षारक्षक फी,#पेन्सिल,नोटबुक #झेरॉक्स,आदर ऍक्टिव्हिटीज, युनिफॉर्म अशा बेकायदेशीर गोष्टींची पैसे वसूल करण्यात आलेले आहे आणि फी भरलेली पावती मध्ये अनेक त्रुटी असून यात #शाळेचे_नाव_शिक्का असलेल्या पावत्या शाळेतच ठेऊन त्यावर्ती तारीख सुद्धा नसलेले निदर्शनात आले व #पालकांची_दिशाभूल करत #शाळेच नाव नसलेल्या व #शिक्का नसलेले #कच्ची_पावती दिली जाते ,ज्या पालकांना फि गोष्टीची वेळात पूर्तता करता आलेली नाही त्यां विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा पद्धतीमध्ये बसू न देणे किंवा #शाळेतून_दाखला काढून घेऊन जावा अशा पद्धतीच्या #धमक्याही फोन द्वारे व एसएमएस'द्वारे आलेले आहेत.
या शिक्षण संस्थेने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005,साथीचे रोग अधिनियम 1897 त्यानुसार राज्य शासनाने दिलेले आदेश धाब्यावर बसवत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 असे अनेक #शैक्षणिक कायदे डावलत #मनमर्जी कारभार चालू केलेला असून त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील या पालकांना योग्य न्याय मिळावा म्हणून प्रहार संघटनेकडे तक्रारारी बऱ्याच आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण या गोष्टींमध्ये हे लक्ष घालून या #संस्थेवर ठोस अशी #कारवाई करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाला मोठे जन आंदोलन करण्यास भाग पाडू नये यातून होणाऱ्या सर्व नुकसानीस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल असा इशारा देण्यात आले तसेच आणखीन कोणत्या #शिक्षण संस्थेविषयी #पालकांना_तक्रार असेल त्यांनी #संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री.जयराज कोळी यांनी केलेले आहे याप्रसंगी अनिस मुजावर युवक तालुका अध्यक्ष हातकणंगले वैभव हातकणंगले तालुका सचिव अक्षय जाधव जिल्हा समीर येवलुज शहर प्रमुख झुंजार शितल कुर्लै कुरले माधुरी म्हेत्रे युवती सचिव नीरज पाटील आदी पदाधिकारी उपस्थित