केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सुरक्षा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी रिपाइंच्या शिष्टमंडळाने घेतली गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट
PRESS MEDIA LIVE :
मुंबई दि. 12 - केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करीत ना रामदास आठवलेंची सुरक्षा पूर्ववत करण्याची मागणी केली.यावेळी झालेल्या चर्चेत ना रामदास आठवले यांना वाढदिवसानिमित्त एकीकडे काव्यमय शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख देतात तर दुसरीकडे तेच गृहमंत्री अनिल देशमुख ना रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात करतात हे कसे काय असा प्रश्न रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना यावेळी विचारला. या शिष्टमंडळात रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर; मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; रमेश गायकवाड; चंद्रशेखर कांबळे;सचिन बनसोडे; रश्मी यादव आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान आज संपूर्ण महाराष्ट्रात ना. रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राज्य सरकार विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले.
बहुजनांचे संघर्षनायक नेते केंद्रिय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांची सुरक्षा दोन दिवसांत पूर्ववत करण्यात आली नाहीतर येत्या दि.17 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बांद्रा येथील मातोश्री निवासस्थानी रिपाइं तर्फे निषेध आंदोलन करण्यात येईल असा ईशारा बहुजन विद्यार्थी पतिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी आज दिला.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे राज्य सरकार विरोधात आज मंगळवार दि. 12 जानेवारी रोजी मुंबईत आझाद मैदान या ठिकाणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदे चे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे आणि मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. त्या वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आंदोलन करण्याचा ईशारा दिला.
दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा राज्य सरकार चा निर्णय हा राजकीय द्वेष भावनेतून आणि कोत्या मनोवृत्तीतून घेण्यात आलेला चुकीचा निर्णय आहे. त्याबाबत फेरविचार करण्याचे राज्य सरकार ला निर्देश द्यावेत या मागणीसाठी लवकरच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या नेतृत्वात रिपाइं चे शिष्टमंडळ महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे रिपाइं तर्फे अधिकृत कळविण्यात आले आहे.