महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदासाठी  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या बरोबरच भोर चे आमदार  संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू.


PRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला : 


पुणे : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याबरोबरच पक्षाचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाने आदेश दिल्यास त्या प्रमाणे काम करण्याची आपली तयारी असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले. थोपटे यांची निवड झाल्यास संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या साठ वर्षानंतर पुण्याला प्रथमच संधी मिळण्याची शक्‍यता आहे.या  संदर्भात संपर्क साधला असता प्रदेशाध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा असल्याचे मला माध्यमातील बातम्यांमधूनच समजले. मात्र, पक्षाने कोणताही आदेश दिला तर त्याप्रमाणे काम करण्याची आपली तयारी असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार झाले आहेत. त्यांचे वडिल अनंतराव थोपटे हे कडवे काॅंग्रेस एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक वर्षे विविध खाती सांभाळली होती.

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्यापाठोपाठ आज आमदार थोपटे यांच्या नावाची चर्चा सरू झाल्याने पुण्याला अध्यक्षपद मिळणार अशी चर्चा झाली आहे. या चर्चेप्रमाणे प्रत्यक्षात काही घडले तर महाराष्ट्राच्या इतिहास पुण्याला प्रथमच संधी मिळण्याची शक्‍यता आहे. काॅंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी चार जानेवारी रोजी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. त्यात त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यानंतर नव्या नावांची चर्चा सुरू झाली. पटोले यांच्यासह थोपटे, अमित देशमुख, सुनील केदार, यशोमती ठाकूर यांच्या नावांची चर्चा होत आहे. यातील थोपटे वगळता इतर सर्वांकडे पद आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये थोपटे यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी त्यांचे नाव यादीतून काढण्यात आले. त्यामुळे त्यांना योग्य वेळी संधी मिळणार असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदी एखाद्या मंत्र्याची वर्णी लागल्यास संबंधित जागा थोपटे यांना मिळू शकते, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होण्याआधी कॉंग्रेसच्या पक्ष संघटनेत विदर्भ आणि मुंबई प्रांत वेगळा होता. मुंबई प्रांताच्या अध्यक्षांना त्या काळच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मानले जाई. मात्र. त्या काळातही मामासाहेब देवगिरीकर व केशवराव जेधे वगळता पुण्यातल्या नेत्याला प्रांताध्यक्ष होण्याची संधी मिळाली नव्हती. केशवराव जेधे व मामासाहेब देवगिरीकर यांना ही संधी बराच काळ मिळाली होती. त्याकाळी मुंबई प्रांताचे म्हणजे महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्य कार्यालय पुण्यात कॉंग्रेस भवन होते. आजही पुणे शहर कॉंग्रेस भवनाची मालकी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसकडे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबईत टिळक भवनात कॉंग्रेस मुख्यालय हलविण्यात आले. त्याआधी कित्येक वर्षे प्रदेश कॉंग्रेसचे मुख्यालय पुण्याती कॉंग्रेस भवन हेच होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पुण्याला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. पुण्याने अनेकवेळा राज्याच्या राजकारणाला दिशा दिली. राज्यच्या राजकारणाचे केंद्रस्थान अनेकवेळा पुणे राहिले आहे, मात्र, पुण्याला प्रदेशाध्यपदाची संधी मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे, यास ज्येष्ठ काॅंग्रेस नेते उल्हास पवार यांनीही दुजोरा दिला.

Post a Comment

Previous Post Next Post