शिरढोण :
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या शिरढोण येथील शोभा सदाशिव खोत (वय ४२) या महिलेचा अनोळखी व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केल्याची खळबळजनक घटना घडली. शनिवारी (दि.२३) दुपारी शिरढोण येथील मुजावर मळा येथे घडली. हल्लेखोर आणि हल्ल्याचे कारण सायंकाळपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र उडाली आहे.
Tags
Crime