मुंबई : राज्यात मागच्या काही दिवसांपासून अनेक संघटनांनी 'संभाजी बिडी' चे नाव बदलण्यात यावे अशी मागणी केली होती. अखेर या संघटनांच्या मागणीला न्याय मिळाला आहे कारण कंपनीने संभाजी बिडी हे नाव बदलले आहे. त्यामुळे यापुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने या विडीची विक्री होणार नसल्याचे सांगण्यात येत आह
पुण्यातील 'साबळे वाघीरे आणि कंपनी' ही कंपनी संभाजी बिडी या नावाने विडी उत्पादन करते. साबळे वाघीरे आणि कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलण्याची घोषणा यापूर्वीच केली होती, परंतु नाव बदलण्यास थोडा वेळ लागेल असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. आता अखेर कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलले आहे.
Tags
Latest