तारदाळ - निमशिरगाव रस्त्याचे काम त्वरीत करा :अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन .
हातकणंगले तालुक्यातील तारदाळ -निमशिरगाव रस्त्याचे काम मागील एक वर्षापासून बंद अवस्थेत असल्याने त्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना व नागरिकांना होत आहे .तरी हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा या मागणीसाठी शिवसेना तारदाळ शाखा यांच्या वतीने तारदाळ ग्रामपंचायत ग्रामसेवक पी .व्ही कांबळे व पंचायत समिती सदस्या सौ . अंजना शिंदे यांना निवेदन देण्यात आले .
तारदाळ निमशिरगाव रस्त्यासाठी 50 / 54 मधून कोट्यावधी रुपये निधी मंजूर झाला आहे .सदर रस्त्याचे काम एक वर्षांपूर्वी सुरू झाले असून सदर रस्ता हा अर्धवट व निकृष्ट दर्जाचा झालेला असल्याने रस्त्यावरील खडी उचकटून बाजूला पडत आहे .यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शेतकरी व वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे .सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा शिवसेना यांच्यावतीने लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा चे निवेदन देण्यात आले आहे .
यावेळी सतिश खोचरे ,सचिन भोसले , विशाल पवार , गौरव जाधव , सागर नाईक ,उदय कोळी , अक्षय चौगुले आदिंसह शिवसैनिक उपस्तीत होते .