PRESS MEDIA LIVE :
मुंबई । आजपासुन देशात कोरोना लसीकरणास सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या लसीकरणाचं उद्धाटन केलं. महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला. मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. 'लसीकरणाच्या रुपात आपण एक क्रांतिकाक पाऊल टाकत आहोत' असे म्हणत त्यांना राज्यातील जनतेला संबोधित केले.
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर या विषाणूनं हाहाकार माजवला, ते दिवस आठवतांना रुग्णांची सेवा करणाऱ्या प्रत्येक कोरोना योद्धांना मुख्यमंत्र्यांनीतसेच कोरोना काळात मोलाचं सहकार्य करणाऱ्या टास्क फोर्स टीममधील डॉक्टरांचा अल्लेखही मुख्यमंत्र्यानी केला.
कोरोना लस आलेली आहे. तरीही मास्क काढायचा नाही. हात धुवा, मास्क वापरा, अंतर ठेवा. असे संकट पुन्हा येऊ नये एवढीच प्रार्थना करतो. लसीकरणाला सुरुवात झालेली आहे आता कोरोनाचा शेवट करायचा आहे. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.