अन्यथा या कंपन्यांवर बंदी घालावी..
व्यापारी संगटनेची मागणी
नवी दिल्ली - व्हाट्स ऍप् कंपनी आपली पालक कंपनी फेसबूकबरोबर ग्राहकांची माहीती शेअर करणार आहे. तसे करण्यापासून व्हाट्स ऍप कंपनीला प्ररावृत्त करावे अन्यथा या कंपन्यांवर बंदी घालावी अशी मागणी व्यापाऱ्यांच्या संघटनेने केली आहे.
कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेने असा दावा केला आहे की व्हाट्स ऍपच्या नव्या धोरणानुसार ग्राहकांची वैयक्तिक माहिती व्यवहाराची माहिती संपर्क होत असलेल्या व्यक्ती, ठिकाण आणि इतर माहिती दोन्ही कंपन्यात परस्परादरम्यान वारणार आहेत. संघटनेने माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, असे करण्यापासून व्हाट्स ऍपला रोखावे अन्यथा या कंपनीवर बंदी घालावी.
फेसबुकचे भारतामध्ये 20 कोटी जर या माहितीचा दुरुपयोग झाला तर अर्थव्यवस्थेवर आणि देशाच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. मात्र व्हाट्स ऍपच्या प्रवक्त्याने सांगितले की आम्ही पारदर्शकता वाढावी याकरिता नवीन धोरण जाहीर केले आहे. मात्र ज्या ग्राहकांना हे धोरण मान्य नसेल त्यांना व्हाट्स ऍप बंद करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.
व्हाट्स ऍपच्या नव्या धोरणामुळे परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही. फक्त आम्ही या क्षेत्रात पारदर्शकता आणली आहे असे प्रवक्ता म्हणाला. मात्र व्यापाऱ्यांच्या संघटनेने म्हटले आहे की, व्हाट्स ऍपचे नवे धोरण ग्राहकाच्या खाजगी माहीतीवर अतिक्रमण आहे. त्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्याच्या घटनात्मक अधिकाराचा भंग होतो असे या व्यापाऱ्यांच्या संघटनेने म्हटले आहे.