ग्रामपंचायत निवडणूक : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस.
PRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला :
पुणे : राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 15 जानेवारीला सातारा जिल्ह्यातील तब्बल 900 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. तर, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
कोरोनामुळे अनेक निवडणूक लांबणीवर पडल्या आहेत. यातील ग्रामपंचायती निवडणुकांचं मतदान येत्या १५ तारखेला पार पडणार आहे. दरम्यान, गावांमधील निवडणूक बिनविरोध व्हाव्यात यासाठी अनेक आमदारांनी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं होतं. अनेकांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास लाखोंचा निधी देण्याचा शब्द दिला. निवडणुकीच्या काळात भावकीतील तंटे, गावातील घटकांमध्ये वाद, ईर्ष्या, हे टाळून बंधुभाव व एकी कायम राहावी यासाठी या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला होता.
दरम्यान, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून लढत कोणकोणत्या उमेदवारांमध्ये होणार हे चित्र आज स्पष्ट होईल. अनेक ग्रामपंचायत बिनविरोध कट गावातील लोकांनी या अभियानाला प्रतिसाद दिला. तर काही गावात चक्क सरपंचपदासाठी बोली देखील लावण्यात आली होती. प्रामुख्याने राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, आमदार निलेश लंके, आमदार सुनील शेळके, आदी नेत्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते.