इचलकरंजी : रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व रोटरी क्लब ऑफ इचल अॕन्स
श्रीमती आ रा पाटील कन्या महाविद्यालय, आणि डिकेएससी कॉलेज,निर्भया पथक इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व विद्यार्थीना महिला विद्यार्थीना आत्मनिर्भर व स्वसंरक्षण शिबिर समारोप प्रसंगी दिपप्रज्वलीत करुन प्रशिक्षित विद्यार्थीनी प्रमाणपत्र वितरण नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आपल्या मनोगतामध्ये नगराध्यक्षा ॲड सौ स्वामी वहिनी नी शिक्षणाच्या जोरावर विविध क्षेत्रात भरारी घेण्यार्या युवतीनी स्वसंरक्षित असणे महत्वाचे आहे.आत्मसंरक्षाची कला अवगत असेल तर आत्मविश्वास दुणावतो त्यामुळे विद्यार्थीनीनी ज्युदो कराटे सारख्या कलेतुन वेळप्रसंगी बचाव करणारे व आक्रमकतेचे डावपेच शिकावेत असे मत व्यक्त केले.यावेळी व्यासपिठावर कार्यक्रम चे अध्यक्ष प्राचर्य डाॕ अनिल पाटील सर, रोटरी अध्यक्ष रो अभय यळुरुटे,प्राचार्य डाॕ ढेकळे सर , रोटरी अॕस्नच्या अध्यक्षा सौ मेघा यळरुटे, सचिव सौ वैभवी निगुडगेकर , कराटे कोच सौ किरण चौगुले अदि उपस्थित होते*