इचलकरंजी नगरपालिकेच्या प्रलंबित मागण्यांचे नगराध्यक्षा ॲड सौ.अलका स्वामी वहिनी यांचे नगरविकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना निवेदन.
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :
इचलकरंजी नगरपालिकेच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन नगराध्यक्ष सौ.अलका स्वामी यांनी नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन दिले.शहराच्या विकासात्मक दृष्टीने पाणीप्रश्न, भुयारीगटर योजना, सांडपाणी प्रकल्प, सहायक अनुदान यांसह विविध प्रलंबित मागण्यांबाबत नगराध्यक्षा ॲड सौ.स्वामी यांनी मंत्री शिंदे व खासदार धैर्यशील माने यांच्याशी विस्तृत चर्चा केली. इचलकरंजी शहराच्या विकासासाठी शासनाने प्रलंबित योजना मार्गी लावाव्यात, अशी मागणी आढावा बैठकीत करण्यात आली.यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, महिला बालकल्याण सभापती सारिका पाटील,बांधकाम सभापती उदयसिंह पाटील,नगरसेवक रविंद्र माने,महादेव गौड,भाऊसाहेब आवळे आदी उपस्थित होते.*
Tags
Latest News