ग्राहक पंचायतीचे प्रेरणा स्थानस्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी...!
ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा इचलकरंजी च्या वतीने शाखेच्या कार्यालयात स्वामी विवेकानंदांच्या जयंती कार्यक्रम घेण्यात आले. प्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन उपाध्यक्ष श्री अशोक ठोमके यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या नंतर सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
या वेळी इचलकरंजी शाखेचे अध्यक्ष मा.सुरेंद्र दास यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची माहिती संक्षिप्त रूपात सांगितली.यानंतर कार्यवाहक मा.श्री.अरुण साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमास सचिव-सुरेश सारवाडे , कोषाध्यक्ष-संजय शिरदवाडे, संघटक-लालचंद पारिक, सहसंघटक-अविनाश वासुदेव, वंदना भंडारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते...शेवटी आभार लक्ष्मण पाटील यांनी मानले...!