पुणे : "पीपल्स आर्ट सेंटर" संस्थेची स्थापना मुंबई येथे सन 1979 साली करण्यात आली. सदर संस्थेच्या माध्यमातून गेल्या 40 वर्षात विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. 1032 पेक्षा अधिक कार्यक्रम संस्थेने आज रोजी पर्यंत घेतलेले आहे.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदाचा होणारा हा कार्यक्रम कोरोनाच्य महाभयंकर साथीमध्ये लोकांना मदत करण्यासाठी ज्यांनी आपला वेळ,पैसा आणि श्रम खर्च केले त्यांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात येणार आहे.
मुंबई,ठाणे,पुणे,कोकण या भागातील 20 मान्यवरांचा covid-19 योद्धा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
covid-19 या आजाराने मरण पावलेल्या पुणे जिल्ह्यात सर्व जाती-धर्मांचे अंत्यविधी करणारे पुणे महानगरपालिकेतर्फे कोणताच मानधन न घेता व कुटुंबाकडून पैसे न घेता जवळपास नऊशे लोकांचे त्या-त्या धर्मानुसार अंत्यविधी करणारे पुणे येथील मूलनिवासी मुस्लीम मंचाचा ही सन्मान या कार्यक्रमांमध्ये होणार आहे.
रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई. येथे दिनांक 26 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी होणाऱ्या या कार्यक्रमात *विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते.*
श्री प्रवीण दरेकर साहेब.
आमदार श्री.सदा सरवणकर.मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर.श्री.रमेश चंदर (आयुक्त जी.अँड एस.टी) तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थित covid-19 योद्धा सन्मान सोहळा पार पडणार आहे.