पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटल बाबत प्रशासनाने घेतला निर्णय.
PRESS MEDIA LIVE : पुणे :
पुणे- करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शिवाजीनगर येथील सीओईपीच्या ग्राऊंडवर उभारण्यात आलेले जम्बो हॉस्पिटल हे दि. 15 जानेवारीपासून तात्पुरते बंद करण्यात येणार आहे. सध्यस्थितीत करोना करोना रुग्णांची संख्या तीव्र गतीने कमी होत आहे. तसेच शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बेड रिक्त आहेत. यापार्श्वभूमीवर जम्बो हॉस्पिटल हे तात्पुरते बंद करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जम्बो हॉस्पिटलमध्ये दि. 1 जानेवारीपासून नवीन रुग्णांना प्रवेश बंद करण्यात आला. सध्यस्थितीत जम्बो हॉस्पिटलमध्ये सुमारे 95 रुग्णांवर उपचार सुरू असून या सर्व रुग्णांना घरी सोडल्यानंतर हे हॉस्पिटल बंद करण्यात येणार आहे .सध्या ससून हॉस्पिटल, नायडू हॉस्पिटल, बाणेर येथील कोविड सेंटर, पिंपरी येथील वायसीएम रुग्णालय आणि ऑटो क्लस्टर करोना रुग्णालयांमध्ये बेड रिक्त आहेत. यामुळे जम्बो हॉस्पिटल तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जम्बो हॉस्पिटलमध्ये मशीन, इतर आरोग्य उपकरणे तशीच राहणार आहे. शासनाचा जो निधी आरोग्य कर्मचारी इतर बाबींवर खर्च होत आहे, कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध असताना तात्पुरती उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलवर खर्च का करायचा या हेतूने जम्बो हॉस्पिटल बंद करण्यात येत आहे. जम्बो हॉस्पिटलवर दर महिन्याला चार ते साडेचार कोटी रुपये खर्च होत आहे.