डिजिटल व सोशल मीडियाचे दिवस येणार. माजी डी आय जी. अब्दुल रहमान सर. ...... प्रेस मीडियाचा एकविसाहवा वर्धापन दिन सोहळा संपन्न.



 


पुणे येथे प्रेस मीडियाचा एकविसावा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न



 भविष्य काळात  डिजिटल व सोशल मीडियाचे दिवस येणार. माजी पुणे शहर डीआयजी. अब्दुल रहमान सर.

प्रेस मीडियाचा एकविसावा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न.

PRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला : 

पुणे :  भविष्य काळात डिजिटल मीडिया व सोशल मीडिया चे दिवस येणार त्या मुळे  सर्वांनीच आता डिजिटल व सोशल मीडिया कडे लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पुणे शहरातील माजी डी आय जी अब्दुल रहमान यांनी केले. ते प्रेस मीडियाच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.ते पूढे म्हणाले की पत्रकारिता क्षेत्रात काम करणे अत्यंत अवघड असून ते ठीकवणे देखील तितकेच अवघड काम आहे. या  क्षेत्रात  जे पत्रकार , संपादक आपले काम निर्भिड पणें  करतात त्यांचे कार्य अत्यंत अनमोल व मोठे आहे, असे सांगत पत्रकार , संपादक व सर्व मीडिया यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक अब्दुल रहमान यांनी  केले.

  पुणे शहरातील नावाजलेली वृत्तसंस्था प्रेस मीडिया चा ekvusaava वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे प्रेस मीडिया च्या वतीने सामाजिक, शैक्षणिक,  पत्रकारिता , कला, साहित्य   क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान राज्यस्तरीय गौरव 2020 हा पुरस्कार देऊन करण्यात आला करण्यात आला.

 गायकी  क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य  करणारे  सुप्रसिद्ध कव्वाल सुलतान नाजा , अमर पुणेकर , साईबा चिस्ती कव्वाल या सर्वाँना आदर्श संगीत रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  तर पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या  शबनम न्यूज च्या  संपादिका शबनम सय्यद , सज्ज ग नागरी टाइम्स चे संपादक मजहर खान , मेरा भारत टाईम्स चे संपादक उस्मान कादरी , महाज टाईम्स चे संपादक मुना फ शेख , मराठी दुनियादारी चे संपादक अल्ताफ पिरजादे  दैनिक कातीब चे संपादक जुल्फिकार सहेर या सर्वाँना आदर्श संपादक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पत्रकार मध्ये ज्येष्ठ उर्दू पत्रकार मोहम्मद जावेद मौला , जी सलाम चे मझहर शेख , महाज टाईम्स चे उपसंपादक शफी शेख , आज का आनंद उर्दू सफा संपादक मोहम्मद शुकृ ल्लाहा या सर्वाँना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

      सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे अली सय्यद( कराठे ) इंडियन मुस्लिम  फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष मुनोवर कुरेशी , मुबीन खान,  एजाज शेख कोंढवा,  महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट च्या पुणे शहर अध्यक्षा आफशा अन्सारी , एडवोकेट आयुब शेख, इम्तियाज शेख (रोशन मस्जिद) , अझहर खान , स्वतंत्र सेनानी  हाजी चांद हाजी शेख , इचलकरंजीचे पाटलोबा पाटील या सर्वाँना आदर्श समाज सेवक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर अंजुम इनामदार यांना आदर्श समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

       शैक्षणिक क्षेत्रां मध्ये कार्य करणारे नाजिम शेख प्रिन्सिपॉल लिमरा एज्युकेशन, पुणे , शो एब अन्सारी प्रिन्सिपॉल , यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर मिर्झा अहमद बेग यांना आदर्श जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे माजी डी आय जी अब्दुल रहमान साहेब हे होते, तर प्रमुख पाहुणे हाजी झाकीर शेख , मजहर नजीर शेख, मो.हबीब शेख हे होते. या कार्यक्रमाचे आयोज क प्रेस मीडिया चे संपादक मेहबूब सर्जेखान यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. सदर कार्यक्रमास  पुणे शहरातील अनेक मान्यवर  उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार प्रेस मीडियाचे संपादक मेहबूब सर्जेखान, कार्यकारी संपादक लियाकत सर्जेखान यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मिर्झा अहमद बेग यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post