देशातील प्रत्येक शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. माजी खासदार राजू शेट्टी.
PRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला :
पुणे - शेतकऱ्यांची अथवा इतर कोणत्याही घटकाची मागणी नसताना केंद्र शासनाने केवळ अदानी आणि अंबानी या उद्योगपतींना कृषी क्षेत्रात व्यवसाय करता यावा यासाठी शेतकऱ्यांना जाचक ठरणारी तीन विधेयके आणली आहेत. त्यामुळेच या विधेयकास देशभरातून विरोध होत आहे. केवळ पंजाब, हरियाणा आणि चंदीगड येथील शेतकऱ्यांचे हे आंदोलन नसून हे देशातील प्रत्येक शेतकऱ्याचे आंदोलन असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. शेट्टी म्हणाले, गेल्या 12 दिवसांपासून राजधानीत या विधेयकाविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. तसेच ही विधेयके रद्द करण्याची मागणी होत आहे.मात्र, केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली जात नाही.
राष्ट्रीय महामार्गांवर खंदक करून शेतकऱ्यांचे मोर्चे अडवले जात आहेत. त्यांच्या मनात काय हे जाणून घेतले जात नाही. उलट हे आंदोलन खलिस्तानीवादी लोकांचे आहे, असे म्हणत जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकरी अशांत झाला तर संपूर्ण देश अशांत होईल. त्यांचा संयम तुटला तर त्याचा देशात उद्रेक होईल, त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्याशी बोलून तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली