अवैध गुटखा विक्री आणि वाहतूक करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलिसांना दिले.
PRESS MEDIA LIVE : पुणे : मुनाफ शेख :
पुणे शहरातील विविध भागात अवैध गुटखाविक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोहीम राबविली आहे. त्यामुळे अवैध गुटखाविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस आयुक्तांनी 33 पथकांची स्थापना करून 29 जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 22 लाख 27 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये गुटखा, सिगारेट, वाहनांचा समावेश आहे. गुटखाविक्रीला बंदी असतानाही शहरात विक्री आणि वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांना दिसून आले होते. त्यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी 33 पथकांची स्थापना करून गुटखाविक्री करणाऱ्यांची शोधमोहीम राबविली. त्यानुसार 23 जणांवर गुन्हे दाखल करीत 29 जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली शहरातील अवैध गुटखाविक्रीचा बिमोड करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.