बेडकिहाळ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे पानिपत.
29 उमेदवारा पैकी काँग्रेस चे 23 उमेदवारांनी बाजी मारली
PRESS MEDIA LIVE :. बेडकिहाळ तालुका प्रतिनिधी :
बेडकिहाळ : तालुका प्रतिनिधी : बेडकिहाळ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सन्मानिय ज्येष्ठ नेते गोपाळ दादा पाटील यांच्या नेतृत्वखाली पंचवीस उमेदवारा पैकी तेवीस उमेदवार बाजी मारून इतिहास रचला. सन्माननीय गोपाळ दादा पाटील हे सर्व कार्यकरत्याना घेऊन दिवस रात्र प्रत्येक वार्डा मध्ये जाऊन भेटी गाठी घेऊन विजयी करून ग्रामपंचायतीवर काँग्रेस चा झेंडा फडकविला आहे.
प्रत्येक समाज्याच्या नेत्यांना घेऊन बौद्ध संघटना, महीलाना त्यांच्या बरोबर घेऊन हजारोंच्या संख्येने भाजपला धक्का देण्यासाठी विजयी रॅली काढून संपूर्ण गाव काँग्रेस मय केले. तरुणा सारखे नेतृत्व गोपाळ दादा पाटील यांनी करून पंचवीस पैकी तेवीस उमेदवार विजयी करून भाजप चे पानिपत केले. गेल्या सहा महिन्यांपासून बेडकिहाळ ग्रामपंचायतीची निवडणूकीची तयारी सुरू होती. सर्व धर्माच्या नेत्यांना विचारात घेऊन उमेदवारांना उभे केले आहे.आघाडीच्या प्रमुखमाजी आमदार काकासाहेब पाटील यांची सुकन्या व गोपाळ दादा पाटील यांची सून सौ. सुप्रिया दत्तकुमार पाटील यांनी संपूर्ण बेडकीयाळ मधील महिला घेऊन विजयाची मानकरी ठरल्या. आज संपूर्ण गावा मधुन विजयाची रेली श्री गणेश मंदिर पासून ते श्री ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.
तेथून विजयी उमेदवार काँग्रेसचे थोर नेते , युवा कार्यकर्ते, मन महीला कार्यकर्त्या पोलिस बंदोबस्ता मध्ये सहभागी होऊन रॅली ची सांगता गणेश मंदिर रामनगर मध्ये गेली त्या वेळी सन्मानि य ज्येष्ठ नेते गोपाळ दादा पाटील यांनी मतदारांचे आभार मानले त्या वेळी अनेक नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.