विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली.
PRESS MEDIA LIVE : .इचलकरंजी : मनू फरास :
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आमच्या निवासस्थानी भेट दिली. जेष्ठ नेते व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या पत्नी व माझ्या मातोश्री इंदुमती आवाडे यांचे निधन झाले. त्यामुळे आवाडे कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी आज भेट घेतली.
त्यांचे स्वागत आमदार प्रकाशआण्णा आवाडे,मा.श्री.स्वप्निलदादा आवाडे,जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.राहुल आवाडे व आवाडे परिवारातील इतर सदस्यांनी केले.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक,मा.श्री.प्रकाश दतवाडे,नगरसेवक सुनिल पाटील,मा.श्री.प्रकाश सातपुते,मा.श्री.अशोक आरगे,मा.श्री.विलास गाताडे,मा.श्री.अहमद मुजावर,मा.श्री.बाळासाहेब कलागते,नगरसेवक दिपक सुर्वे,मा.श्री.नितेश पोवार व आदि कार्यकर्ते उपस्थित होते.