पार पडले भूमिपूजन.

  पेशव्यांच्या टांकसाळीच्या जागेतील गोपालकृष्ण मंदिराचा  होणार जीर्णोद्धार !    

 आडचणींच्या जंजाळातून वाट काढत पार पडले भूमिपूजन.


PRESS MEDIA LIVE : पुणे :

दस्तुरखुद्द पेशव्यांचे सावकार असणाऱ्या दुर्लभशेठ यांच्या मालकीच्या जागेत असलेली टांकसाळ नंतर तेथील गोपाळ कृष्ण मंदिरासह 'समस्त बाराजाती गुजराती महाजन' संस्थेच्या ताब्यात आल्यानंतर अनेक दशकांचा अडचणींच्या जंजाळातून जाऊन जीर्णोद्धाराच्या टप्प्यावर पोहोचली आहे !

पुण्याच्या महागड्या लक्ष्मी रस्त्यावरील या प्रशस्त जागेत असलेल्या ऐतिहासिक मंदिराचा जीर्णोद्धार होत असून १७ डिसेंबर रोजी भूमिपूजन समारंभ पार पडला. या ट्रस्ट चे अध्यक्ष ज्योतिप्रकाश सराफ,सौ शोभना सराफ यांच्या हस्ते हा भूमिपूजन समारंभ पार पडला. 

पेशव्यांनी दुर्लभशेठ यांना व्यापारासाठी पुण्यात पाचारण केले होते.ते या जागेतून व्यापार करीत असत.पुढे पेशव्यांची टांकसाळ या जागेत उभी राहिली. २०० वर्षाचा इतिहास असलेली ही वास्तू आणि जागा भाडेकरू आणि वहिवाटीच्या जंजाळात अडकली होती . 

कोर्ट,कचेऱ्या,तक्रारी,नोटिसा,परिसरातील अनेकांचा त्रास अशा चक्रव्यूहातून जात जात ट्रस्ट ला अखेर जीर्णोद्धाराचा संकल्प मार्गी लावता आला आहे. ट्रस्ट चे अध्यक्ष ज्योतिप्रकाश सराफ यांच्या नेतृत्वाखाली विश्वस्त मंडळाने त्यासाठी परिश्रम घेतले . दोनशे वर्षातील या मंदिराचा हा दुसरा जीर्णोद्धार ठरला आहे. 

लक्ष्मी रस्त्यावर सतरंजीवाला किंवा गोपालकृष्ण या नावाने प्रसिद्ध असलेल्या  चौकात असलेली १४ हजार  चौरस फूट इतकी जागा या प्रकल्पास आता उपलब्ध असून मंदिर,  सभागृहासह दुमजली बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण केले जाणार आहे. या जागेत पुढे धार्मिक ,सांस्कृतिक तसेच ट्रस्ट चे धर्मादाय   उपक्रम चालवले जाणार आहेत.या जागेस लागून असलेल्या अल्पसंख्यांक वस्तीतील रहिवाशांनीही भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहून मंदिर बांधकामास सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द दिला. 

भूमिपूजन कार्यक्रमास ट्रस्ट चे सचिव बालेशभाई शहा, विश्वस्त, निवृत्त जिल्हा न्यायाधीश आर ए मेहता ,उद्योजक भूपेंद्र श्रॉफ ,एडव्होकेट तेजलकुमार आहेर यांच्यासह जागेतील भाडेकरू ,दुकानचालक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.                                                                                                                    

Post a Comment

Previous Post Next Post