संशोधन क्षमता विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेस चांगला प्रतिसाद
PRESS MEDIA LIVE : पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस च्या 'संशोधन क्षमता आणि शास्त्रीय दृष्टिकोन निर्मिती ' या विषयांवरील दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेस चांगला प्रतिसाद मिळाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ पराग काळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार हे अध्यक्ष स्थानी होते. देशातून आणि देशबाहेरून ११० संशोधक ,विद्यार्थी ,प्राध्यापक या कार्यशाळेत सहभागी झाले. डॉ वसंत बंग ,डॉ संदीप प्रभू ,डॉ सचिन कदम ,डॉ अर्चना सिंग ,डॉ हरिदास आचार्य , डॉ रोशन काझी यांनी मार्गदर्शन केले
अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसचे प्रभारी संचालक डॉ रोशन काझी यांनी स्वागत केले . या कार्यशाळेत संशोधन पर निबंध सादर करण्यात आले .