सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील सर्व खटले

सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील  सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय राज्याच्या गृहखात्याने घेतला आहे.


PRESS MEDIA LIVE : मुंबई :

मुंबई : राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय आता राज्याच्या गृहखात्याने घेतला आहे. यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात आला. सत्तेत येताच फडणवीस सरकारने काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळातील सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बहुतांश खटले भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल झाले होते.

फडणवीस सरकारच्या निर्णयाची आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारने पुनरावृत्ती केली आहे. आधीच्या सरकारच्या काळातील खटले मागे घेण्याचा शासन निर्णय राज्याच्या गृहखात्याच्या वतीने जाहीर करण्यात सरकारच्या या निर्णयामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळणार आहे.

फडणवीस सरकारच्या काळात अनेक सामाजिक आणि राजकीय आंदोलन पार पडली. त्यावेळी अनेक खटले हे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आले होते. त्यामुळे फडणवीस सरकारच्या पावलावर पाऊल टाकत आता फडणवीस सरकारच्या काळात दाखल झालेले सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राज्यातील सामाजिक आणि राजकीय आंदोलनाच्या वेळी 31 डिसेंबर 2019 पर्यंत प्रविष्ट करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्यशासनाने 2 डिसेंबर, 2020 या दिवशी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे खटले मागे घेण्याकरिता वित्त आणि नियोजन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली मंत्रिमंडळाची उपसमिती बरखास्त करण्यात आली आहे. यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळात 1 नोव्हेंबर 2014 पूर्वीचे खटले शासनाने मागे घेतले होते; मात्र त्यानंतरही राज्यात विविध राजकीय, सामाजिक आणि अन्य आंदोलनांची संख्या सतत वाढतच आहे, तसेच त्यानंतर फडणवीस सरकारच्या काळातही अनेक राजकीय, सामाजिक आंदोलनं पार पडली.

डिजिटल प्रेस मीडिया आता टेलिग्रामवर.

Post a Comment

Previous Post Next Post