इलेक्ट्रिक रिक्षा हा रोजगाराचा नवा पर्याय - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
PRESS MEDIA LIVE : मुंबई :
मुंबई दि. 2 - इलेक्ट्रिक रिक्षा ही प्रदूषणविरहित पर्यावरणपूरक असून बेरोजगारांना रोजगाराची नवी सुसंधी देणारी असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे इलेक्ट्रिक रिक्षा चे उदघाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ना. रामदास आठवले बोलत होते.यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर ; नेक्स्टजेन क्लीनटेक सोल्युशन कंपनी चे शंकर कन्नन ; महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस्थापक गेडाम आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
इलेक्ट्रिक रिक्षा बेरोजगारांना घेण्यासाठी बॅंकांद्वारे कर्ज उपलब्ध व्हावे तसेच महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाद्वारे मागासवर्गीय बेरोजगारांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी बैठकीचे आयोजन ना रामदास आठवले यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.
आजच्या स्पर्धात्मक युगात बेरोजगारांना रोजगार म्हणून इलेक्ट्रिक रिक्षा एक चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे. इलेक्ट्रिक रिक्षा हे प्रदूषणविरहित वाहन आहे. बेरोजगारांना रोजगार म्हणून इलेक्ट्रिक रिक्षा ; मालवाहतूक करणारी इलेक्ट्रिक रिक्षा या वाहनांचा लाभ घ्यावा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी यावेळी केले.
दरम्यान मुंबई सिनेउद्योगासाठी अनुकूल असून मुंबईतील सिनेउद्योग अन्यत्र कोणीही हलवू शकत नाही. उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मुंबईत स्वागत आहे.त्यांना मुंबईतील सिनेउद्योग युपीत न्यायचा नाही.देशात सर्वच राज्यात स्थानिक भाषेचे सिने निर्माण होतात. त्यामुळे यूपीत त्यांना स्वतंत्र नवी फिल्मसिटी उभारायची असेल तर तो त्या राज्याचा अधिकार असून आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. असे ना. रामदास आठवले म्हणाले.