भाजपचे काही आमदार लवकरच


 भाजपचे काही आमदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक.

PRESS MEDIA LIVE : मुंबई :


मुबंई | भाजपचे काही आमदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पव्रेश करणार आहेत. योग्य वेळी त्यांची नावे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जाहीर करतील, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.यामुळे भाजपाचे नेमके कोणते आमदार फुटणार, याबद्दल तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.

महाविकास आघाडी सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात आघाडी सरकार पडण्याचे अनेक मुहूर्त भाजपाच्या काही नेत्यांकडून देण्यात आले, मात्र सरकारला काही झाले नाही. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांत भाजपाला मोठा धक्का बसला व आघाडीने यश मिळवले.त्यानंतर राजकीय चित्र हळूहळू बदलायला सुरुवात झाली आहे. आघाडी सरकारकडून विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपाचे काही आमदार फुटणार असल्याचा दावा सातत्याने करण्यात येत आहे.


नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेटविधानसभेतच भाजपा नेत्यांना हा इशारा दिला होता की, "फक्त चार महिने थांबा, आमच्याकडून तुमच्याकडे गेलेले अनेक जण राजीनामा देऊन परत येतात की नाही हेच बघा", असे अजितदादा म्हणाले होते, भाजपाचा राजीनामा जे येतील त्यांना तिन्ही पक्षांचे समर्थन मिळेल त्यामुळे निवडणुन येण्यास त्यांना कोणतीच अडचण उरणार नाही, अशी ऑफरही अजितदादांनी दिली होती.

त्यानंतर विधानसबेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित दादांचा दावा खोडून काढला होता. आमचे 105 आमदार आहेत, त्यातील एकही कमी होमार नाही उलट वाढतीलच असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले होते. आता नवाब मलिक यांनीही भाजपाचे काही आमदार आमच्या पक्षनेतृत्वाच्या संपर्कात आहेत. ते लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. योग्य वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्याची घोषणा करतीलच, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post