तर आपण शेवटचे आंदोलन करणार.... आण्णा हजारे .
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत रामलीला किंवा जंतर मंतर येथे जागा मिळाली तर आपण शेवटचे आंदोलन करणार आहोत, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले. दिल्ली आंदोलनातील शेतकऱयांच्या मुलांनी आज राळेगणसिद्धीत येऊन अण्णांची भेट घेतली.अण्णा म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोनदा आंदोलन केले. मोदी सरकारने दिलेले लेखी आश्वासन पाळले नाही. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे.
मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचा थाळीनाद
दिल्लीत आंदोलन करणाऱया शेतकऱयांच्या मागण्यांवर अद्याप अंतिम तोडगा न निघाल्याने शेतकऱयांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला दिल्लीतील शेतकऱयांनी पंतप्रधानांविरोधात थेट थाळीनादाचा एल्गार पुकारला असून येत्या 27 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रेडिओवर 'मन की बात' सुरू होताच देशभरातील शेतकऱयांनी थाळीनाद करीत आपला विरोध दर्शविण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांकडून करण्यात आले आहे.
अनेक शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई
उत्तर प्रदेश गाजीपूर बॉर्डरवरून दिल्ली गाठणाऱया हजारो शेतकऱयांचे ट्रक्टर जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. येत्या 24 तासांत ही कारवाई बंद नाही केल्यास महामार्गावरील दुसरी लेन रोखून धरण्यात येईल, असा इशारा व्ही. एम. सिंह यांनी दिला आहे..
Tags
Maharastra-