पुण्याची महाराणी 2020 स्पर्धा.

 पुण्याची  महाराणी  २०२०  स्पर्धा.

सौ. सीमा अनिल इंग्रोळे यांना इंटरनॅशनल महाराणी म्हणून पुण्याची महाराणी या सौंदर्य स्पर्धेत  पुरस्कारीत करण्यात आले.




नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र सौभाग्यवती या स्पर्धे मध्ये महाराष्ट्राची सरस्वती म्हणून गौरवलेल्या सौ. सीमा अनिल इंग्रोळे यांना काल इंटरनॅशनल महाराणी म्हणून पुण्याची महाराणी ह्या  सौन्दर्य स्पर्धेत पुरस्कारीत करण्यात आले.  14आणि 15डिसेंबर ला  नीता मोकाशीच्या  ऋणानुबंध विवाह संस्था यांनी आयोजित केलेली स्पर्धेचे मार्गदर्शन श्रुती पाटोळे आणि रत्ना दहिवलेकर यांनी केले होते. या तिघींच्या सहकार्यामुळे मलेशिया मध्ये राहुन  देखील त्या ऑनलाईन या स्पर्धेत भाग घेऊ शकल्या त्यामुळे त्या तिघींचे मनापासून आभार व्यक्त करत आहेत. .

सौ सीमा यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बागणी  मघ्ये झाला. लग्नानंतर मुंबईत पहिले ४ वर्षा काढल्या नंतर अपरिचित आणि न एैकलेल्या अशा मलेशिया देशात येऊन पोहोचल्या. गेली  ३०  वर्षे मलेशिया  मध्ये  राहतात  

त्यांना  पैंटिंग करणे, कविता लिहणे, भरपूर प्रवास करणे, नव नवीन पदार्थ बनवणे,  त्याच प्रमाणे काही टूर्स अरेंज करणे यांचा  खूपच  छंद आहे

त्या सोशली खूपच सक्रिय आहेत.  जवळजवळ दोन ते अडीच हजार मित्र मैत्रिणीशी रोज गप्पा मारत असताना  त्यांच्या सुखदुःखात सामील होणे त्याच प्रमाणे आता पँडेमिक मध्ये मानसिक आधाराची गरज असताना आधार देतत् 

त्यांच्या  मित्र  त्यांचे  वर्णन  करताना  म्हणतात 

*निखळ हास्याचा झरा ... म्हणजे सिमा अनिल ईंगोळे...*

“आनंदाचं झाड... म्हणजे  सीमा इंग्रोळे 

सीमा ही निगर्वी सर्वसमावेशक व सोशल अस्पेक्ट असणारी व सर्वांना मदत करणारी व्यक्ती आहे.

पुरस्कार  मिळाल्या  नंतर  त्या  म्हणाल्या  कि  "पुणे हे एतेहासिक, सांस्कृतिक आणि विध्येचे माहेरघर आहे. एतेहासिक काळात महाराणींचे एक वेगळेच स्थान होते. पुण्याची महाराणी या स्पर्धेत त्यांचं नाव दिल्याने या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास माझी उत्सुकता द्विगुणित झाली. स्रियांच्यासाठी स्रियांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये भाग घेऊन माझा आत्मविश्वास वाढला  आहे. या पुस्कारामुळे  मी सध्या जे काही करत आहे ते पुढे चालू ढेवण्यास प्रेरणा देत आहे." महाराष्ट्राची महाराणी हि स्पर्धा मार्च एप्रिल २०२१ मध्ये आयोजित करणार आहेत असेही सांगितलं आहे

Post a Comment

Previous Post Next Post