राहुल कुंभार यांना राष्ट्रीय खेलरत्न पुरस्कार
PRESS MEDIA LIVE : जयसिंगपूर :
जयसिंगपूर: येथील राहुल कुंभार यांना क्रीडा संघटक म्हणून फिनिक्स राष्ट्रीय खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
फिनिक्स स्पोर्ट्स अँड कल्चरल ग्रुप व रोलर स्केटिंग क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने ४५ खेळाडू ,१५ प्रशिक्षक, ७ शिक्षक आणि २ संघटक यांचा पुरस्काराने यावेळी गौरव करण्यात आला.
याप्रसंगी रोलर स्केटिंग क्रिकेट असोसिएशनचे ओंकार शुक्ल, स्नेहा खरे, डॉ. विकास पाटील, डॉ. शिरीष चव्हाण ,डॉ समीर शेख ,डॉ. अनुराधा चव्हाण, डॉ. रणजीत चिडगुपकर, डॉ. विनोद परमशेट्टी ,फिनिक्स स्पोर्टचे अध्यक्ष विनायक ऐनापुरे यांनी आभार मानले.
फोटो ओळी: जयसिंगपूर येथील राहुल कुंभार यांना क्रीडासंघटक म्हणून फिनिक्स राष्ट्रीय खेलरत्न पुरस्कार देताना स्मृती पाटील,स्नेहा खरे,ओंकार शुक्ल,डॉ विकास पाटील, डॉ शिरीष चव्हाण यांच्यासह मान्यवर