भादोले गावात" मैत्रीचा "हात
PRESS MEDIA LIVE :
भादोले ग्रामपंचायत मध्ये गरजू चांदेल वसाहत मधील विधवा निराधार लोकांना जीवनावश्यक वस्तूची मैत्री फाऊंडेशन इचलकरंजी मार्फत मदत करण्यात आली. तसेच धनगर समाजातील एका निराधार गरजू महिलेला राहण्यासाठी निवारा शेड उपलब्ध करून देण्यात आली. मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष श्री चन्द्र प्रकाश जी छाजेड यांनी आपल्या भाषणामध्ये फाउंडेशन विषयी माहिती दिली व भविष्यात भादोले गावातील गरजू व्यक्तींना औषधोपचाराची मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच छाजेड यांना गावातील विविध संस्थांनी विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री प्रेमसिंग जी चव्हाण, सुरेश कुमार ललवाणी साहेब,उदयसिंगजी सोडा ,मैत्री परिवार चे अध्यक्ष श्री संजय घाडगे ,मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष श्री चंद्रप्रकाशजी छाजेड, महिला अध्यक्ष सौ वहिदा नेजकर, सदस्य अंजली शर्मा व सुवर्णा खराडे ,मैत्री फाऊंडेशन सदस्य नंदू साळुंखे,उज्वल चराटे, पांडुरंग गोरे,श्रीकांत जोशी,श्रीकांत जोशी कपिल बगाडीया तसेच गावातील सरपंच आनंदा कोळी उपसरपंच सौ सुजाता नांगरे,सदस्य आनंदा सुतार ,अल्ताफ जमादार,युवक काँग्रेस अध्यक्ष कपिल पाटील कै. शि. दा.पाटील सोसायटीचे चेअरमन दिलीप पाटील, संचालक प्रल्हाद माने सरकार, बबन माने, पंडित पाटील, हनुमान दूध संस्थेचे चेअरमन दीपक पाटील,सचिव संपतराव पाटील तसेच या कार्यक्रमासाठी धडपड करणारे सामाजिक कार्यकर्ते सचिन नांगरे व समीर सनदे उपस्थित होते.