ग्राम पंचायत निवडणूक




गाव पुढाऱ्यांनी सावध पवित्रा घेत नवी  व्यूहरचना आखण्यास केली सुरुवात .

PRESS MEDIA LIVE : 

गडहिंग्लज : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीची पारंपरिक व्यूहरचना विस्कळित झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर गावपुढाऱ्यांनी सावध पवित्रा घेत नवी व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे.

सरपंचपदासाठी यापूर्वी तीन वेळा निघालेल्या आरक्षणाच्या आधारावर नव्या जोडण्या लावल्या जात आहेत. आरक्षण कोणते येईल, याचा अंदाज बांधत सरपंचपदासाठी ठसर उमेदवार देण्यावर भर दिला जात आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी गावपातळीवर नियोजन आखले जात आहे. आघाड्यांची रचना करण्यात गावपुढारी व्यस्तप्रभाग आरक्षणानुसार उमेदवारांची प्राथमिक निवड करण्याची प्रक्रिया पक्ष-आघाड्यांच्या पातळीवर सुरू आहे. संभाव्य राजकीय लढाईला तोंड देण्यासाठी सर्व बाजूंनी सज्ज राहण्याचा प्रयत्न स्थानिक नेत्यांकडून सुरू आहे.


दरम्यान, सरपंचपदाच्या आरक्षणानुसार उमेदवार देण्याची पारंपरिक व्यूहरचना बदलण्याची वेळ आली आहे. बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन गावपुढाऱ्यांनीही पवित्रा बदलला आहे. सरपंचपदासाठी यापूर्वीच्या तीन निवडणुकीत कोणते आरक्षण पडले आहे, याचा अभ्यास केला जात आहे. जुन्या आरक्षणाच्या आधारावर नवे आरक्षण कोणते पडेल, याचा अंदाज बांधला जात आहे. त्याबाबत जाणकारांशी चर्चा केली जात आहे. त्यानुसार उमेदवार देण्याचे नियोजन केले जात आहे.

अडचण नको म्हणून...
निवडणुकीनंतर जाहीर होणारे सरपंचपदाचे आरक्षण कोणते असेल, याचा सध्यातरी अंदाजच बांधणे हातात आहे. आपल्या पक्ष-आघाडीला बहुमत मिळाले, पण आरक्षित जागेच्या उमेदवाराचाच पराभव झाला असेल तर, मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे संभाव्य आरक्षणाचा अंदाज बांधून चांगला उमेदवार देण्यासाठी खटाटोप सुरू आहे.

दाखल्यांसाठी जमवाजमव...
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षित झाले आहेत. अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्गातील प्रभागातून उमेदवारीसाठी ज्या-त्या प्रवर्गाच्या दाखल्यांची आवश्‍यकता असते. हे दाखले मिळविण्यासाठी जमवाजमव सुरू आहे. खुद्द उमेदवारांपेक्षा पक्ष-आघाडीचे प्रमुख कार्यकर्तेच धावाधाव करताना दिसत आहेत. त्यासाठी पडणारा आर्थिक भारही सोसला जात आहे.


Post a Comment

Previous Post Next Post