ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी

 बेडकीहाळ येथील ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी सन्मानिय, गोपाळदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भव्य शक्ती प्रदर्शन 

मतदारांच्या मनधरनीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा : 

      





PRESS MEDIA LIVE : बेडकियाळ :. प्रतिनिधी :

बेडकिहाळ ग्राम पंचायतीसाठी निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असताना बेडकिहाळ येथील जेष्ठ नेते सन्मानिय गोपाळदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण गावातून  पायी रायली ढोल ताशाच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतीषबाजीने बेडकिहाळ नगरी दनानुन गेली. बेडकिहाळ चे थोर नेते गोपाळदादा पाटील यांनी प्रत्येक समाजातील प्रमुख नेत्यांना व कार्यकर्त्यांना तसेच  संघ संघटनेतील महिलांना  त्याबरोबर २९ उमेदवारांना घेऊन हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन ही रायली काढन्यात आली. ही रायली म्हनजे बीजेपीला   धक्का असल्याची चर्चा गावातून होत आहे. संपूर्ण गावातून रायली फिरुन आल्यानंतर रामनगर गणेश मंदिराजवळ मोठी सभा घेण्यात आली. त्यावेळी ऍड. बी.एम.शास्त्री यांनी आपल्या मनोगतामध्ये कॉंग्रेस हा बलाढय मोठा पक्ष असुन त्याचे नेत्रुत्व सगळे तरुनाईसारखे गोपाळदादा पाटील हे सर्वांना घेऊन करत असतात. संपूर्ण २९ उमेदवारांना निवडून आनन्याचे ध्येय बाळगून कार्यरत आहेत. ही निवडणूक नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे.

    गेल्या सहा महिन्यांपासून बेडकिहाळ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीची तयारी हे नेते सर्व धर्मीय लोकांना विचारात घेऊन उमेदवारांना उभे केले आहेत.  मा. काकासाहेब पाटील यांची कन्या व गोपाळदादा पाटील यांची सुन सौ.सुप्रीया पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सर्व महिला भव्य रॅली मध्ये उपस्थित होत्या. 


 सुप्रीया पाटील या भविष्यामध्ये  आमदार होतील. असे त्यांचे नेत्रुत्व आहे. असे  बी.एम.शास्त्री. म्हनाले.  तसेच प्रमोद पाटील यांनी सुध्दा आपल्या मनोगतामध्ये म्हनाले की, ही रायली बघून भारतीय जनता पार्टीचे पायाखालची वाळु सरकली असेल. आमचा विजय निश्चित आहे. तसेच जीवन यादव यांनीसुद्धा  आपले मनोगत व्यक्त केले. तसेच मा.सौ.सुप्रीयाताई पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हनाल्या की बेडकिहाळचा विकास हाच आमचा ध्येय असेल. २९ उमेदवारांना निवडून देण्याचे आव्हान सुप्रीयाताई यांनी मतदारांना केल्या. 

   सर्व रायली मध्ये सामील झालेल्या कार्यकर्त्यांचे आभार अनिल सुर्यवंशी यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post