आमदार प्रकाश आवाडे.

28 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पॉवरलुम असोसिएशन तर्फे सर्व यंत्रमागधारक प्रतिनिधींची बैठक आमदार प्रकाश आवाडे आणि बोलवली आहे.





PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

इचलकरंजी :  वस्त्रोद्योगाला भेडसावणार्‍या समस्या व निर्माण होत असलेल्या अडचणी या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करण्यासह मंजूर योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करुन पुढील दिशा ठरविण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी सोमवार 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशन येथे शहरातील सर्व यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलविली आहे.

संपूर्ण वस्त्रोद्योगाला आज विविध संकटांनी घेरले आहे. शासनाकडूनही जाहीर योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने वस्त्रोद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यातच आठवडाभरात शहरातील अमर डोंगरे व महेश जावळे या दोन यंत्रमागधारकांनी आत्महत्या केल्याने यंत्रमाग व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्वच विषयासंदर्भात माहिती देऊन वस्त्रोद्योगाला पुन्हा उभारी मिळण्यासाठी पुढाकार घेऊन पाठबळ द्यावे यासाठी शहरातील यंत्रमागधारकांनी शुक्रवारी आमदार आवाडे यांची भेट घेतली. यावेळी वीजेचे वाढते दर, सूत दरात सातत्याने केली जाणारी वाढ आणि कापडाला नसलेली मागणी यामुळे यंत्रमागधारक मेटाकुटीला आला असून यातून सावरण्यासाठी तुम्हीच पुढाकार घेऊन वस्त्रोद्योगाला पुन्हा एकदा नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी उपस्थित यंत्रमागधारकांनी आमदार आवाडे यांच्याकडे केली. त्याचबरोबर आवाडे हे मंत्री असताना त्यांनी राबविलेल्या 23 कलमी पॅकेजची अन्य राज्यात अंमलबजावणी आजही होत असल्याचे सांगत महाराष्ट्रात मात्र ही सवलत बंद करण्यात आल्याबद्दल संतापही व्यक्त केला.

माहिती जाणून घेतल्यानंतर आमदार आवाडे यांनी, मागील पाच वर्षापासून संपूर्ण वस्त्रोद्योग आर्थिक अरिष्टातून जात आहे. चार वर्षापूर्वी तत्कालीन सरकारने वीज दरात सवलतीसह विविध योजना जाहीर केल्या होत्या. परंतु आजतागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तर विद्यमान सरकारकडूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत आपल्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या असतील तर केवळ चर्चा न करता सर्वांनी एकजुटीने लढ्यात सहभागी व्हायले पाहिजे, असे सांगितले. या संदर्भात चर्चा करुन पुढील दिशा ठरविण्यासाठी सोमवारी पॉवरलूम येथे बैठकीत शहरातील सर्वच यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी प्रकाश दत्तवाडे, सुनिल पाटील, विकास चौगुले, संजय सातपुते, सचिन भुते, गोपाळ उरणे, जनार्दन चौगुले, अमोल कदम, ओंकार जावळे, योगेश जावळे, दिगंबर रेडेकर, निवृत्ती आमणे, सागर सातपुते, धनंजय फाटक, आबा निऊंगरे, मनोहर रेडेकर, बाळकृष्ण पिष्टे, राजेश देसाई, अवधूत मांगोरे, संजय बाली आदी यंत्रमागधारक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post