नमस्कार रसिकहो,
" एक रविवार : एक गझल " : भाग अठ्ठावीस
( रविवार ता. २० डिसेंबर २०२०)
गझल : चिता
---------------------------------
गझल असो किंवा कविता असो, शेवटी ती माणसाच्या म्हणजेच पर्यायाने समाजाच्याच भोवती फिरते .माणूस हा नाशवंत असल्यामुळे त्याच्यात अपूर्णतेची जाणीव आहे. त्याच जाणिवेमुळे सर्व कला समृद्ध होत जातात.तसेच दिलखुलास, मनमुराद आनंद देणे व घेणे हे मानवी जीवनाचे सार आहे. ज्यांच्यापर्यंत प्रकाश पोहोचू शकला नाही ,त्यांच्यापर्यंत तो नेण्याचे काम करणे ,तसा प्रयत्न करणे यातच खरा आनंद आहे. गझलेने तो केलेला आहे,दिलेला आहे.
गझलच्या मैफली ,मुशायरे रात्र- रात्रभर चालतात. जग झोपले तरी गझलकार व त्याची गझल जागी असते .सुख आणि दुःख या जीवनाच्या अटळ बाजू आहेत.संपूर्ण सुखी किंवा संपूर्ण दुःखी असा माणूस दुर्मिळच. जीवनाची हीच खुमारी आहे. गझलकार वेगवेगळ्या अनुभवातून ,दाखल्यातून तेच तर मांडत असतो. गझलकाराचे शेर हे केवळ त्याच्या काळजात वास करत नसतात.तर श्वासातुन आणि रक्तातुन वाहत असतात अशी माझी स्वतःची धारणा आहे .कवी इतिहास आठवत, भविष्य पहात वर्तमानात जगत असतो. त्यामुळे अनेकदा त्याचे लेखन समकालीनते बरोबरच कालातीतही असते. ( ' गझलानंद ' च्या प्रस्तावनेतून )
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )