माणुसकीची माणूसकी.

 इंदिरा गांधी रुग्णालयाच्या व १०८ रूग्णवाहीकेच्या भोंगळ कारभार. 

माणुसकी फौंडेशनची तीव्र भूमिका .


PRESS MEDIA LIVE : 

इंदिरा गांधी रुग्णालय हे रुग्णांना उपचार करणारे रुग्णालय नसून रूगांना मृत्यूच्या दारात उभे करणारे यमदुत निर्माण झाले आहे. रुग्णांच्या उपचारासाठी कोणतेही सुविधा रुग्णालयात उपलब्ध नाहीत, रुग्ण तेथे  उपचारासाठी पोहचला तर रुग्णालयात शस्त्रक्रियेचे व्यवस्था नाही, अत्याआवश्यक असणारे मशीन उपलब्ध नाही या कारणांमुळे सगळे रुग्ण सांगली सिव्हिल किंवा कोल्हापूर CPR ला पाठवण्यात येतात. त्याच सोबत १०८ रुग्णवाहिका ही कित्येक वेळेला योग्य वेळात पोहोचत नाही. रुग्णवाहीकेवर कित्येक वेळेला डॉक्टर नसल्याने ती वाहीका रुग्णांना सेवा देऊ शकत नाही अशी परिस्थिती नेहमीच १०८ रुग्णवाहीकेची असते. कालचीच घटना गणेशनगर येथे अपघात झालेल्या व्यक्तीच्या कानातून व डोक्यामधून रक्तस्राव होत असल्याने तात्काळ IGM ला पोहचवले पण तिथे उपचारासाठी व्यवस्था नसल्याने IGM ने सांगली सिव्हीलला पोहचवण्यासाठी सांगितले. पण पुढे पोहचवण्यासाठी १०८ रुग्णवाहीकेला संपर्क केला असता इचलकरंजी व आजूबाजूच्या परिसरातील एकही रुग्णवाहीकेवर डॉक्टर नसल्याने बाहेर गावावरून रुग्णवाहीका मागवावी लागली ती रुग्णवाहिका यायला २.३० तास लागले तो पर्यंत त्याची परिस्थिती गंभीर होत होती. रुग्णांवर उपचार होत नसेल व योग्य वेळात १०८ रुग्णवाहिका पोहचत नसेल तर यांचा उपयोग काय..?

किती दिवस यातनांनी तळमळत असलेल्या रुग्णाच्या जीवाशी IGM रुग्णालय व १०८ रूग्णवाहीका खेळणार..?

सोळा महिन्यांपूर्वी माणुसकी फौंडेशनने इंदिरा गांधी रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात लाक्षणिक उपोषण करून १३ मागण्या समोर ठेवल्या होत्या त्यातील हातावरच्या बोटावर मोजण्याइतपच मागण्या पूर्ण झाल्या आहेत..

त्यातील अत्यंत अत्यावश्यक मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या नाहीतर आंदोलनाचे स्वरूप तीव्र करू असा इशारा माणुसकी फौंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे यांनी केला आहे.यावेळी सर्व माणुसकी फौंडेशनचे सदस्य उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post