भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात 'सायबर अँड नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्फिग्युरेशन 'विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा
PRESS MEDIA LIVE : पुणे :
भारती अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात 'सायबर अँड नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्फिग्युरेशन 'विषयावर ६ दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन ३० नोव्हेंबर रोजी झाले. सीडॅक च्या संशोधन विभागाचे वरीष्ठ संचालक डॉ. सुब्रम्हण्यम् नीलकंठन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.भारती अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव हे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. १७ राज्ये आणि बाहेरील दोन देशातून एकूण २६७ जण या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.
' सायबर सिक्युरिटीसाठी फक्त कायदे करून, धोरणे आखून काही होणार नाही तर जागरूकता निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन डॉ. आनंद भालेराव यांनी केले.
डॉ. संदीप वांजळे यांनी प्रास्ताविक केले.डॉ. सुहास पाटील यांनी आभार मानले.