पंतप्रधान नरेंद्र मोदी .आज दुपारी चार वाजता पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूला भेट देणार आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूला भेट देणार आहेत.



PRESS MEDIA LIVE : 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचं सांगितलं आहे. मात्र आता पंतप्रधानांच्या दौऱ्यात बदल झाला असून दुपारी चार वाजता इन्स्टिट्यूटला भेट देणार आहे.

कोरोना लसीच्या प्रगतीची तसेच निर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी उद्या अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद येथे जाऊन तयारीची पाहणी करणार आहेत. अहमदाबाद येथून पाहणी केल्यानंतर पंतप्रधान मोदी सीरम इन्स्टिट्यूटला दुपारी 1 वाजता भेट देणार होते. मात्र आता या वेळेत बदल झाला असून पंतप्रधान दुपारी 4 वाजता भेटसिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला, संशोधक आणि शास्त्रज्ञ यांच्याशी ते संवाद साधणार आहेत.

लसीच्या निर्मितीच्या प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी शंभर देशांचे राजदूत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला 4 डिसेंबरला भेट देणार होते. परंतु त्यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे. महाराष्ट्रात लसीकरण कशारितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिली होती. कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत, असंही ते म्हणाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 नोव्हेंबर रोजी सर्वाधिक कोरोना संक्रमित आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात, दिल्ली या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाची वर्तमान स्थितीची माहिती तसेच कोरोना लस वितरणासंदर्भातील तयारीबाबत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post