लेक टाऊन बिबवेवाडी ' ग्रीन रिक्षा स्टॉप 'च्या हिरवाईची तपपूर्ती ! लायन्स क्लब च्या ' ग्रीन रिक्शा स्टॉप ' दीर्घकालीन पर्यावरणस्नेही वृक्षारोपण मोहिमेस यश
PRESS MEDIA LIVE : पुणे :
बिबवेवाडी लेक टाऊन परिसरात लायन्स क्लब इको फ्रेंडस् ' ग्रीन रिक्षा स्टॉप ' या दीर्घकालीन वृक्षारोपण मोहिमेस यश आले आहे . लेकटाऊन ( बिबवेवाडी ) परिसरात वृक्षारोपण करून लावलेल्या झाडांची तपपूर्ती रविवारी साजरी करण्यात आली. लायन्स क्लब ऑफ इको फ्रेंडस् आणि लेक टाऊन यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.
यावेळी लायन्स क्लब इको फ्रेंडस चे अनिल मंद्रुपकर यांनी वृक्षारोपण मोहिमेस सहकार्य करणाऱ्या रिक्शाचालकांचे कौतुक केले.
ही सर्व झाडे १२ वर्षात २० फूट उंच झाली असून पादचाऱ्यांना सावली देत आहेत.
'लायन्स क्लब ची सर्वसामान्य नागरिकांप्रती आणि पर्यावरणाप्रती असलेली सामाजिक वीण घट्ट असून ही वृक्षारोपण मोहीम त्याचे चांगले उदाहरण आहे,असे प्रतिपादन अनिल मंद्रुपकर यांनी केले . या वृक्षारोपण मोहिमेस गणेश बिराजदार, दीपक धोंडे, सुहास कुलकर्णी, पंकज काबरा, राजीव गंभीर,सुदीन जयप्पा , सपना गंभीर, राहुल बुरगुल यांनी सहकार्य केले . अशा प्रकारचे आदर्शवत ठरणारे दिशादर्शक प्रकल्प पुणे शहरात इतर ठिकाणी देखील साकार केले जातील, असे अनील मंद्रुपकर यांनी सांगीतले.