प्रसाद कुलकर्णी :

      नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

        




आज मंगळवार  ता. ३ नोव्हेंबर २०२० रोजी PoetMeNotLeave मध्ये माझी कविता पोस्ट करत आहे. आज दुसरा दिवस आणि दुसरी कविता. ही पोस्ट करण्यासाठी मराठीतील ज्येष्ठ कवियत्री गझलकारा प्रा.डॉ.सुनंदा शेळके ( जयसिंगपूर )  आणि ज्येष्ठ गझलकार मा.दीपक करंदीकर ( पुणे )यांनी माझे नाव सुचवले याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो.या मॅरेथॉनमधल्या कविता रशियन अलमनॅक मध्ये प्रकाशित होणार आहेत.

माझी इथे पोस्ट केलेली कविता मुळात मी मराठीत लिहिली आहे. आणि माझा मुलगा प्रत्युष याने ती इंग्लिशमध्ये भाषांतरित केली आहे. मराठी भाषेतील जे कवी कवयित्री ही साखळी पुढे चालवु इच्छित आहेत त्यांनी जरुर सहभागी व्हावे असेही नम्र आवाहन करतो.धन्यवाद. 

सोबत 'रस्ता  ही माझी दै.लोकमत च्या १०  जून २००७ च्या अंकात प्रकाशित झालेली कविता.


रस्ता

------

आपलं

अथांग शरीर पसरून 

(कधी कडेला घसरून )

रस्ता अस्ताव्यस्त व्यापलेला असतो

पायवाटे पासून पानंदी पर्यंत...

आणि

गल्लीपासून राष्ट्रीय महामार्गापर्यन्त...

रस्ता असतो अनेकदा

काट्याकुट्यांचा, खाचा खळग्यांचा

कुठे मऊ  मातीचा तर कधी डांबरी 

क्वचित असतो

संगमरवरीही...

परवाच ,

आयुष्यभर खस्ता खाल्लेला

एक रस्ता भेटला आणि म्हणाला ,

येत्या पावसाळ्यानंतर

 जेव्हा माझा डांबरीकरण

 होईल तेंव्हा

 मी नव्याने कात टाकिन...

 नव्या उमेदीने

 साऱ्या वाहनांची ओझी वाहीन..

 पण त्यातूनच 

 माझ्या खाचा खळग्यांच्या जीवनाला

 सुरुवात होईल...

 तेव्हा तू माझा आत्मकथन 

 म्हणून

 माझ्याकडेला

 एवढच लिहून ठेव की ,

"दररोज नवनवी वाहने येत गेली

 आणि 

 रस्ता जुना जुना होत गेला..."

 

 Hello friends,


I'm posting my poem under #PoetMeNotLeave. Today's the first day, the first poem. I thank Prof. Dr. Sundanda Shelke (Jaysingpur)and Deepak karnarikar ( pune )   renowned Marathi Gazalkara, for nominating me for the same. The poems in this marathon will be published in Russian almanac. I've originally written the poem posted here is in Marathi, which is translated into English by my son, Pratyush. I request all Marathi poets who'd like to continue this marathon to participate and post their poems as well. Thank you. 


Here's my poem ' The Road ', published in Daily Lokmat  on  10 th June, 2007


The Road

----------


Stretching its unfathomable being

(Even slipping to an edge)

The road is occupied 

chaotically

From village roads to narrow lanes

and

From pavements to national highways...


The road is often

thorny, full of pits

Sometimes it's soil, sometimes it's tar

Yet at times,

it can be the white marble as well...


Recently

A road, bearing a lifetime of suffering

told me,


When this monsoon is over

And I am asphalted

I will moult once again,

I will carry the load of vehicles

with a new zest

But 

That will be the beginning 

of my another lifetime 

of suffering


And then

At my side

I want you

to write my memoir


'Each day, new vehicles 

kept running

and

The road kept aging.

Post a Comment

Previous Post Next Post