अमोल बालवडकर फाउंडेशनच्या दिवाळी सरंजाम वाटप उपक्रमाचा समारोप

 

५००० कुटुंबाची दिवाळी झाली आनंदी अन् गोड..!                                                                                                                                                                   अमोल बालवडकर फाउंडेशन च्या दिवाळी सरंजाम वाटप उपक्रमाचा समारोप.



PRESS MEDIA LIVE :  पुणे
 :

  'कोरोना महामारीमध्ये परिसरातील नागरीकांवर असलेले आर्थिक संकट पाहता दिपमय आनंदी दिवाळी कशी साजरी करायची हा अनेक कुटुंबासमोर असणारा प्रश्न होता, परंतु दिवाळी सरंजाम वाटपाचा समाज उपयोगी उपक्रम करुन लोकप्रतिनिधी या नात्याने नगरसेवक अमोल बालवडकर हे अतिशय स्तुत्य उपक्रम राबवत आहेत.संकटकाळात लोकप्रतिनिधींनी  समाजाच्या पाठीशी कसे उभे  राहावे,याचा हा वस्तुपाठ आहे', असे प्रतिपादन माजी  केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.   

बालेवाडी येथे नगरसेवक अमोल बालवडकर आयोजित दिवाळी सरंजाम वाटप या समाज उपयोगी उपक्रमाचा समारोप माजी केंद्रिय मंत्री खासदार रावसाहेब दानवे-पाटील व पुणे शहराचे खासदार गिरीश बापट  यांच्या उपस्थितीमध्ये समारोप करण्यात आला.  चार दिवस सुरु असलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातुन परिसरातील ५००० दिवाळी सरंजाम वाटप करण्यात आले.५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान बालेवाडीमध्ये  या कृतज्ञता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.रविवारी सायंकाळी या उपक्रमाचा समारोप झाला.       

खासदार गिरीष बापट म्हणले,'या दिवाळी सरंजाम वाटपासारख्या उपक्रमांमधुन  दिसुन येते कि आमचे लोकप्रतिनिधी विकास कामांच्या बाबतीत जरी गगनाला आपले हात भिडवत असतील तरी त्यांचे पाय अजुन जमिनीवरच आहेत आणि म्हणुन आम्ही सर्व  समाजासाठी कार्य करणार्या अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी कायम ठामपणे उभे आहोत."

यावेळी पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धिरज घाटे, नगरसेवक किरण दगडे- पाटील, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष  राघवेंद्र मानकर, भाजपा कोथरुड विभाग अध्यक्ष पुनित जोशी, नगरसेवक दिपक पोटे, भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, ॲड.सत्या मुळे, मंदार राराविकर, आत्माराम बालवडकर तसेच अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व सभासद व नागरीक उपस्थित होते.

                                                                                     

Post a Comment

Previous Post Next Post