स्मार्ट कार्ड ला 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली
पुणे - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 'स्मार्ट कार्ड'ला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे.एसटी महामंडळाकडून करोना पार्श्वभूमीवर स्मार्ट कार्डची मुदत वाढवण्यात आली. महामंडळाकडून सुमारे 27 घटकांना प्रवासी भाड्यात सवलत देण्यात येते. या योजनेंतर्गत संबंधित लाभार्थींना आधार कार्ड क्रमांकाशी निगडीत असलेल्या 'स्मार्ट कार्ड'ची योजना सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक आगारात ज्येष्ठ नागरिकांसह विविध सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्यात येते.
मात्र, करोनामुळे प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे आणि त्यासंबंधिची माहिती आगारात प्रत्यक्ष देता येत नसल्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात येत असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यातयापूर्वी या योजनेला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु, सध्याची परिस्थिती लक्षात घेत या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.