पदवीधर मतदार नोंदणी अभियान


वारजे येथे भाजपचे पदवीधर मतदार नोंदणी अभियान


 भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची भेट

PRESS MEDIA LIVE :. पुणे :

   भारतीय जनता पक्षाचे वतीने आज रविवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी संपुर्ण पुणे शहरात पदवीधर मतदार नोंदणी महाअभियान राबविण्यात आले.कार्यक्रमाचे संयोजन पुणे मनपाचे स्वीकृत सभासद सचिन दशरथ दांगट यांनी केले 

वारजे माळवाडी परिसरातील नोंदणी कक्षाला भेट देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष  विक्रांत पाटील, आमदार भिमराव तापकीर, युवा मोर्चा पुणे अध्यक्ष बापु मानकर, नगरसेवक सुशील मेंगडे, खडकवासला अध्यक्ष  सचिन बदक, सरचिटणीस  प्रतिक देसरडा,निहाल घोडके ऊपस्थित होते.           

या अभियानात ३२५ पदवीधर मतदारांची नावे नोंदण्यात  आली. गेले काही दिवस सोसायटी परिसरात रहाणारे पदवीधरांचे घरोघरी जाऊन नावनोंदणी ॲानलाईन करून घेण्याचे काम स्वयंसेवक आणि पदाधिकारी यांचे मार्फत केले जात आहे.

 हे अभियान यशस्वी करण्यासाठी रेश्मा पाटणकर, ऋषिकेश रजावात, रेणुका मोरे, वर्षा पवार, परशुराम पुजारी, सिध्दार्थ बदीरगे, ओंकार काळोखे, चेतन मिस्री, करण सोनवणे, व्यंकटेश दांगट, किरण ऊभे, किरण साबळे, महंमद पठाण, अरविंद खताळ यांनी विशेष परिश्रम घेतले. 

   हा कार्यक्रमाचे संयोजन सचिन दशरथ दांगट स्वीकृत सभासद, पुणे मनपा यांनी केले होते.


Post a Comment

Previous Post Next Post