स्वप्नील दौंडे यांचा गौरव.

 



असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर्स कडून स्वप्नील दौंडे यांचा गौरव 

PRESS MEDIA LIVE : 

पुणे :  असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर्स ऑफ इंडिया ' या संस्थेने कोविड काळातील अध्यापनाची दखल घेऊन एम  सी इ सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी मधील प्रा . स्वप्नील दौंडे यांचा प्रमाणपत्र देऊन  गौरव केला आहे. हे मूल्यमापन करण्यासाठी असोसिएशन ने राष्ट्रीय स्पर्धा घेतली होती . कॉलेज ऑफ फार्मसी मधीलस्वप्नील दौंडे ,रजत सय्यद ,प्राजक्ता जगताप हे तीन    प्राध्यापक या स्पर्धेत सहभागी झाले आणि त्यातील स्वप्नील दौंडे यांनी प्रमाणपत्र मिळविले. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,प्राचार्य डॉ किरण भिसे यांनी अभिनंदन केले.                                                                                   

Post a Comment

Previous Post Next Post