राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे सदस्य
आमदार भारत भालके यांचे निधन
PRESS MEDIA LIVE :
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे सदस्य आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री निधन झाले.आमदार भालके यांना ३० ऑक्टोबरला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर पुण्यातील रुबी हॉस्पिटल मध्ये उपचार घेऊन कोरोनातून बरे होऊन ते घरी आले होते. मात्र काही दिवसांनी त्यांची तब्बेत पुन्हा बिघडली होती.
भालके यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुबी हॉलला भेट दिली होती. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.आमदार भालके हे 60 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित
सारकोली गावात होणार अंत्यसंस्कार
आमदार भालके यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता.२८) सकाळी पंढरपूरमधील सरकोली या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आमदार भारत भालके यांचे निधन अत्यंत दुःखदायक व अविश्वसनीय आहे. काँग्रेस पक्षात असताना त्यांचा अनेकदा संपर्क यायचा. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांची धडपड व कारखान्याच्या करिता चिंता मी पाहिली आहे. एक चांगला नेता महाराष्ट्राने गमावला. भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्विट करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी श्रद्धांजली वाहिली.