भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयांत फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम -------------ग्रामविकासात रोबोटिक्स उपयुक्त :प्रा.डॉ.एस के साहा
PRESS MEDIA LIVE : पुणे -
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयांत ए.आय.सी.टी.ई.ट्रेनिंग ऍकेडेमी(अटल) च्या सहकार्याने 'रोबोटिक्स आणि ऑटोमेशन मधील संशोधन संधी'या विषयावर ५ दिवसीय फॅकल्टी डेव्हेलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन मंगळवारी झाले.प्रा.डॉ.एस के साहा आय आय टी (दिल्ली),डॉ. ओव्हाळ यांनी मार्गदर्शन केले.भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव अध्यक्ष स्थानी होते.
देशभरातून २३७ संशोधक,प्राध्यापक,विद्यार्थी या ५ दिवसीय फॅकल्टी डेव्हेलपमेंट प्रोग्रॅम ला उपस्थित आहेत. 'बदलत्या काळात ग्रामीण विकासाच्या कामात रोबोटिक्स तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार असून त्या दिशेने अधिक संशोधन करण्याची गरज आहे',असे प्रतिपादन प्रा.डॉ.एस के साहा यांनी केले.
डॉ एस एस ओव्हाळ म्हणाले,'उद्योग क्षेत्रात उत्पादन वाढविण्यासाठी रोबोटिक्सचा वापर होऊ लागला असला तरी समुद्र संशोधन,बायो मेडिकल उपकरणांचे आरेखन,लॉजिस्टिक्स,अणू विज्ञान या क्षेत्रात रोबोटिक्सचा अधिक प्रभावी वापर शक्य आहे.
डॉ आनंद भालेराव म्हणाले,'जगात पायाभूत सुविधांमध्ये ८८ टक्के इतके रोबोटिक्स ऑटोमेशन होणार आहे.त्यामुळे रोबोटिक्स संशोधकांना अधिक वाव मिळणार आहे.डॉ एस के साहा,डॉ आशिष दत्ता,डॉ एकता सिंगला,डॉ अलेक्झांडर श्वांत,डॉ देबानिक रॉय या फॅकल्टी डेव्हेलपमेंट प्रोग्रॅममध्ये मार्गदर्शन करणार आहेत.डॉ के बी सुतार यांनी आभार मानले.