अभिवादन मिरवणूक रद्द.




एम सी ई सोसायटीची महात्मा फुले अभिवादन मिरवणूक रद्द.

PRESS MEDIA LIVE : पुणे :

‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’(आझम कॅम्पस )च्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी काढण्यात येणारी अभिवादन मिरवणूक  यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.   संस्थेचे सचिव डॉ  लतिफ मगदूम यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. अभिवादन मिरवणूक रद्द करण्यात आली असली तरी संस्थेचे पदाधिकारी  २८ नोव्हेंबर रोजी गंज पेठेतील महात्मा फुले स्मारक येथे जाऊन अभिवादन करणार आहेत . 

गेली १६ वर्षे ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’(आझम कॅम्पस ) च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी व पुण्यतिथीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. संस्थेच्या सर्व शैक्षणिक आस्थापनातील १० हजार  विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यामध्ये सहभागी होतात आणि महामानवाचे मानवतेचे संदेशांचा प्रसार करतात.                                                                                         

Post a Comment

Previous Post Next Post