कोरोनावर विज्ञान मात करेल.

 


कोरोनावर विज्ञान मात करेल : देवेंद्र फडणवीस                            

 कोरोना किलर" उपकरणाचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक                                     

 PRESS MEDIA LIVE : पुणे :

 जागतिक पातळीवर विशेष महत्व प्राप्त झालेल्या आयोनायझेशन या शास्त्रशुद्ध  पद्धतीवर संशोधित "कोरोना किलर"हे मशीन देशभर मान्यताप्राप्त होत असताना  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपकरणाचे कौतुक केले आहे.

 'कोरोनामुळे जनजीवन अस्वस्थ असले तरी, विज्ञान तंत्रज्ञानच त्यावर मात करेल, आणि जनजीवन पूर्ववत होईल ', असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी  नागपूर येथे व्यक्त केला. इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स चे भागीदार आणि एथिक्स ग्रुप ऑफ सर्व्हिसेस चे संचालक  मनोज सु. तायडे यांनी कोरोना किलर उपकरणाची माहिती देवेंद्र फडणवीस यांना दिली.

कार्यक्रमात माज़ी अर्थ मंत्री  सुधीर मुनगंटीवार, माज़ी ऊर्जा मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ विकास महात्मे  हजर होते.

इंडो टेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स, भाऊसाहेब जंजिरे  निर्मित कोरोना किलर उपकरणाची माहिती  मनोज सु तायडे यांच्या मार्फ़त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली व कोरोना किलर  संच देण्यात आले.

यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक संस्था, साखर आयुक्तालय,  शासकीय कार्यालये, देवस्थाने आणि निवासाच्या ठिकाणीही हे मशीन यापूर्वीच  या संस्थेने बसविले आहे. 

भाऊसाहेब जंजिरे म्हणाले ,'कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण मास्क लावणे, आसपासच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करणे हे उपाय करतो.परंत,   असंख्य वस्तूंचे निर्जंतुकीकरण मात्र करू शकत नाही. नेमक्या याच अडचणीवर मात करुन आपले घर किंवा कामाचे ठिकाण कोरोना व्हायरसमुक्त करण्याची क्षमता असलेले तंत्र व मशीन इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक भाऊसाहेब जंजिरे यांनी संशोधित केले. आय. सी. एम.आर. (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) एन. आय. व्ही. (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) तसेच महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण  व संशोधन विभागाने ह्या  मशीनची कार्यक्षमता  प्रमाणित केली आहे. 

 निवासस्थानापासून ते सर्व व्यवसायाच्या ठिकाणी हे मशीन बसविता येते. ज्या ठिकाणी हे मशीन बसविण्यात येते तेथील थोडी हवा ही मशीन घेते आणि त्या हवेचे आयोनायझेशन करून पुन्हा त्या भागातील संपूर्ण  हवेत सोडते. ज्या ज्या ठिकाणी ही  हवा पोहोचते  तेथे हे आयान पोहचतात व  कोरोना व्हायरस आणि  इतर विषाणू तसेच अपायकारक सूक्ष्मजीव नष्ट व निष्प्रभ होतात, असे भाऊसाहेब जंजिरे यांनी सांगीतले

कोरोना किलर ' हे फक्त विजेवर चालणारे आणि साबण किंवा सॅनिटायझर न लागणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे . ते कोणत्याही बंद परिसरात वापरता येते . घर ,हॉस्पिटल ,शाळा ,हॉस्पिटल ,गाड्या ,विमान, प्रयोगशाळा ,क्वारंटाईन सेंटर ,कारखाने ,मंदिरे अशा कोणत्याही ठिकाण ते वापरता येते .  रुग्णाचे मास्क ,हातमोजे ,बेडशीट आणि इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यास देखील हे उपकरण उपयोगी ठरते. 

 सहकार मंत्री बाळासाहेब पाटील ,उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबार दालनातही हे मशीन बसविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अनेक संस्था, साखर आयुक्तालय, शासकीय कार्यालये, देवस्थाने आणि निवासाच्या ठिकाणीही हे मशीन यापूर्वीच  या संस्थेने बसविले आहे,उपमुख्य मंत्री अजित पवार,उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनाही या संशोधनाचे सादरीकरण करण्यात आलेले आहे तसेच अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते  या उपकरणाचे मुंबई येथे  लोकार्पण करण्यात आले,अशी माहिती यावेळी देण्यात आली       .            

       पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील हुतात्मा सहकार ,उद्योग समूहाच्या कार्यालयांमध्ये ही इलेक्ट्रोनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे . वाळवा येथे बसविण्यात आलेल्या कोरोना रोधक यंत्रणेचे उद्घाटन हुतात्मा  सहकार समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांच्या हस्ते  करण्यात आले . 

कोरोना व्हायरसला ही मशीन कशा पद्धतीने निष्प्रभ करते याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती  दिली. त्यानंतर हे मशीन बसविण्यात आले.


प्रात्यक्षिक आणि अधिक माहितीसाठी ९३७१०१०९१८ येथे संपर्क साधता येईल.

                                                                                                                                                                    

Post a Comment

Previous Post Next Post