वीज समस्यांनी पिंपरीतील नागरिक त्रस्त
शिवसेनेने महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर.
वीज प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन.
PRESS MEDIA LIVE : पुणे :
पिंपरी - शहरातील वीजग्राहकांना विविध समस्या भेडसावात आहेत. मात्र त्याकडे महावितरण फारसे गांभिर्याने घेत नाही. त्यामुळे शिवसेनेने ग्राहकांना सुविधा देण्याविषयी महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. येत्या आठवडाभरात वीजप्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले.
प्रभाग क्र. 12 रुपीनगर-तळवडे भागातील वीजबिल समस्यांबाबत शिवसेना मात्र परिस्थितीमध्ये किंचितही सुधारणा झालेली नाही. नादुरुस्त मीटरचे एक वर्षापासूनचे पैसे भरूनसुद्धा ग्राहकांस मीटर वेळेत मिळत नसल्यामुळे, त्यांनी न वापरलेल्या रीडिंगचे सरासरी बिल महावितरणाकडून आकारले जात आहे. बिलावरील रिडींगच्या तारखेस रीडरने घेतलेला फोटो त्याच तारखेस दाखल करावा. वीज बिलावर मीटर रीडिंग घेवून उपलब्ध नाही असे वाचण्यात येते याचा अर्थ काय? रिडींग 1 तारखेला आहे ग्राहकाना 5 तारखेला मेसेज येतो. बिल 15 तारखेला येतात शेवटची तारीख 16 असते यावर ताबडतोब दुरुस्ती करावी. ग्राहकांस 0 रक्कमेचे तसेच जास्त रक्कमेचे बिल असल्यास कर्मचारी बिल ग्राहकांना देत नाहीत.
महावितरणच्या चुकीमुळे विज बिल जास्त आल्यास ते बिल दुरुस्त करून आपल्या कर्मचाऱ्यामार्फत ग्राहकांच्या घरी पोहच करावे. ग्राहकांनी वीज बिल दुरुस्तीस दिल्यास, तीन-तीन महिने बिल दुरुस्त होत नाही. ग्राहकांस 0 ते 30 युनिट रिडींग येत असल्यास मागील दोन वर्षापासून फेरतपास झाला नाही. रोलेक्स कंपनीचे खराब मीटर अजूनही बदली झाले नाहीत ते त्वरित बदली करावे. ज्या ग्राहकांचे मीटर जास्त उंचीवर आहेत, त्यांच्या मीटरचे रीडिंग घेतले जात नाही. मीटर रीडरमार्फत तसा दाखला देण्यात यावा. ते मीटर ताबडतोब महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्वरित खाली घ्यावेत, अशा मागण्या निवेदनात आहेत.
दरम्यान ग्राहकांच्या मीटरच्या अडचणी, तसेच वाढीव वीज बिलासंदर्भात सेक्शन अधिकारी, लाईन स्टाफबरोबर चर्चा करून मार्ग काढू.या समस्या प्रामाणिकपणे सोडविण्याला प्राधान्यक्रम देऊ, असे आश्वासन प्राधिकरणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले .
यावेळी शिवसेना विभागप्रमुख नितीन बोंडे, महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य व शिवसेनेचे शहर संघटक संतोष रमाकांत सौंदणकर, विभाग संघटिका आशाताई भालेकर, विधानसभा चिटणीस अमित शिंदे, शाखाप्रमुख प्रवीण पाटील, उपाधिकारी युवासेना सुनिल समगीर, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश पाटोळे, दयानंद भालेकर व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. अनेक निवेदने दिली आहेत.